https://youtu.be/cIbktxqpls4?si=1TvPMkRsYAAk9jGPhttps://youtu.be/KEgUKQtNRrk?si=xypPE4hITWZ6UJ9oएमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC Rajyaseva Main Exam) 2025 नव्या पॅटर्ननुसार वर्णनात्मक स्वरूपाची होणार आहे. आयोगाने हा पॅटर्न युपीएससी मध्ये देखील मराठी उमेदवारांची निवड अधिक प्रमाणात होण्यासाठी घेतला आहे. Contents
MPSC Rajyaseva Main ला अनन्यसाधारण महत्त्व आहे ,कारण उमेदवाराची अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी यांच्या संयुक्त गुणांवर ठरणार आहे. MPSC Rajyaseva Main Exam 2025 ही एकूण 1750 मार्कांसाठी आहे, त्यामुळे मुख्य परीक्षेत जास्त गुण मिळाल्यास उमेदवाराला अंतिम निवडीसाठी सहज शक्य होईल.
मला यूपीएससी व एमपीएससीमार्गदर्शन क्षेत्रात सहा वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव असून मी दिल्लीतील नामांकित क्लासेस सोबत कार्य केले आहे. या लेखाचा उद्देश माझ्या उमेदवार मित्रांना माझ्या अनुभवाचा फायदा करून देणे आहे. या लेखांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 strategy काय असली पाहिजे .
MPSC Rajyaseva Main Exam 2025 strategy मध्ये खालील घटकांचा समावेश होतो:
- राज्यसेवा मुख्य परीक्षेची योजना, तिचे स्वरूप समजून घेणे. त्याचबरोबर मुख्य परीक्षेत आयोगाला उमेदवारांकडून काय अपेक्षित आहे हे समजावून घेणे. राज्यसेवा मुख्य परीक्षे मागचा हेतू आणि प्रश्नांचे स्वरूप, त्यांचा दर्जा इत्यादी बाबी समजून घेणे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रम समजावून घेणे.
- नवीन पॅटर्न नुसार एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी कुठला वैकल्पिक विषय निवडावा?
- एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा कुठल्या भाषेत द्यावी?
- अभ्यासाची सुरुवात कुठून व कशी करावी?
- गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे अवलोकन आणि पेपर निहाय strategy आणि स्टडी मटेरियल.
- राज्यसेवा मुख्य परीक्षेत यश मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्किल सेट्स.
- उत्तर लेखन कौशल्य. (Answer writing strategy. )
- एमपीएससी राज्यसेवा मेन्स परीक्षेचे तयारी करताना कुठल्या सामान्य चुका टाळाव्यात? (What are some common mistakes to avoid in the MPSC Mains exam?)
या लेखात आपण वर नमूद केलेल्या घटकांपैकी पहिल्या घटकाचा विचार करणार आहोत म्हणजेच नवीन पॅटर्ननुसार राज्यसेवा मुख्य परीक्षेची योजना व नवीन अभ्यासक्रम(New Syllabus). उर्वरित घटकांबाबत आपण पुढे येणाऱ्या लेखात चर्चा करू.
MPSC Rajyaseva 2025 Mains Pattern
MPSC Rajyaseva Main Exam 2025 साठी अभ्यास सुरुवात करण्याअगोदर उमेदवारांनी MPSC Rajyaseva 2025 Mains Pattern समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. नवीन पॅटर्न पुढील प्रमाणे आहे.
टीप:
- पेपर क्रमांक ३ ते ७ साठी, उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजी मध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
- वैकल्पिक विषयांतील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेत म्हणजेच एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तरे देता येतील. ज्या विषयांचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतूनच द्यावी लागतील. मुख्य परीक्षेचे ऑनलाइन प्रणालीव्दारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम उमेदवारांना निवडावे लागेल याची त्यांनी नोंद घ्यावी.
- वरील नियमांचे अनुपालन न केल्यास त्यांच्या उत्तरपत्रिकांचे अनधिकृत माध्यम म्हणून मूल्यमापन करण्यात येणार नाही
- प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात येतील. (भाषा प्रश्नपत्रिका, मराठी साहित्य आणि इंग्रजी म्हणून नमूद केलेल्या माध्यमातून विषय वगळून)
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची योजना समजून घेतल्यानंतर उमेदवारांना आयोगाची नेमकी मागणी काय आहे हे समजणे आवश्यक आहे. आयोगाला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे हे जर विद्यार्थ्यांना कळले तर अभ्यास करणे सोपे होते.आयोगाचा नवीन अभ्यासक्रम यूपीएससी मुख्य परीक्षेकडून प्रेरित आहे, त्यामुळे यूपीएससी मुख्य परीक्षेमध्ये उमेदवारांकडून जी अपेक्षा आहे, तीच अपेक्षा एमपीएससी सुद्धा करेल.
एमपीएससीने एक्झाम पॅटर्न यूपीएससी कडून प्रेरित होऊन घेतला आहे, त्यामुळे आयोगाला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे हे समजून घेण्यासाठी युपीएससीची मुख्य परीक्षा बाबत काय मागणी आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
MPSC Rajyaseva Main Exam नवीन अभ्यासक्रमानुसार उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षा:
- एखाद्या उमेदवाराचे हस्तलेखन सहजपणे वाचण्यायोग्य नसल्यास, त्याला मिळणाऱ्या एकूण गुणांमधून योग्य त्या गुणांची कपात केली जाईल.
- केवळ वरवरच्या ज्ञानासाठी (Superficial knowledge) गुण दिले जाणार नाहीत.
- परीक्षेच्या सर्व विषयांमध्ये शब्दांच्या योग्य अर्थासह सुव्यवस्थित(orderly), प्रभावी (effective)आणि अचूक (exact) अभिव्यक्तीसाठी श्रेय दिले जाईल.
- प्रश्नपत्रिकांमध्ये, जेथे आवश्यक असेल तेथे एस. आय. युनिटचा वापर केला जाईल. उमेदवारांनी प्रश्नपत्रिकांची उत्तरे देताना केवळ भारतीय अंकांचे आंतरराष्ट्रीय स्वरूप वापरणे आवश्यक आहे. (1, 2, 3, 4, 5, 6 इ.).
- उमेदवाराला हवे असल्यास, ते मराठी भाषेतील तांत्रिक सज्ञांसाठी इंग्रजी सज्ञाचा (कंसात)वापर करू शकतात. तथापि उमेदवाराने या नियमाचा गैरवापर केला, तर उमेदवार काही गुण गमावू शकतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये, उमेदवाराचे उत्तर अनधिकृत भाषेत (मुख्य परीक्षेसाठी निवडलेल्या माध्यम व्यतिरिक्त) असेल तर त्याचे मूल्यांकन केले जाणार नाही.
MPSC Rajyaseva Main Exam 2025 स्वरूप:
- मुख्य परीक्षेचा उद्देश : मुख्य परीक्षेचा उद्देश केवळ उमेदवारांची माहिती आणि स्मरणशक्तीच्या श्रेणीचे मूल्यांकन करण्याऐवजी त्यांच्या एकूण बौद्धिक वैशिष्ट्यांचे आणि समजुतीच्या सखोलतेचे मूल्यांकन करणे हा आहे.
- प्रश्नांचे स्वरूप आणि मानक : सामान्य अभ्यासाच्या प्रश्नपत्रिकांमधील (पेपर क्रमांक 4 ते 7) प्रश्नांचे स्वरूप आणि मानक असे असेल की सुशिक्षित व्यक्ती कोणत्याही विशेष अभ्यासाशिवाय त्यांची उत्तरे देऊ शकेल. उमेदवारांच्या विविध विषयांबद्दलच्या सामान्य जागरूकतेची चाचणी घेण्यासारखे प्रश्न असतील, जे नागरी सेवांमधील कारकिर्दीसाठी प्रासंगिक असतील.
- उमेदवाराची क्षमता चाचणी: वरील मुद्द्यात नमूद केलेल्या प्रश्नांमुळे उमेदवाराची सर्व संबंधित मुद्द्यांवरील मूलभूत समज आणि परस्परविरोधी सामाजिक-आर्थिक ध्येय, उद्दिष्टे आणि मागण्यांचे विश्लेषण करण्याची आणि त्यावर दृष्टिकोन ठेवण्याची क्षमता तपासली जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी संबंधित, अर्थपूर्ण आणि संक्षिप्त उत्तरे दिली पाहिजेत.
MPSC 2025 Pattern Marathi नुसार MPSC Rajyaseva New Syllabus 2025 Mains Paper:
पेपर- १ (३०० गुण)-मराठी भाषेचा अर्हताकारी पेपर
महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे.
प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेल:-
- दिलेल्या परिच्छेदांचे आकलन
- संक्षिप्त लेखन
- परिपाठ आणि शब्दसंग्रह
- लघुनिबंध
- इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषेत अनुवाद.
हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत.
पेपर- २ (३०० गुण) इंग्रजी भाषेचा अर्हताकारी पेपर
महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, इंग्रजी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे.
प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेल:-
- दिलेल्या परिच्छेदांचे आकलन
- संक्षिप्त लेखन
- परिपाठ व शब्द संग्रह
- लघुनिबंध
हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत.
पेपर- ३ (२५० गुण) निबंध
- उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांचेकडून अपेक्षित आहे.
पेपर- ४ (२५० गुण)-सामान्य अध्ययन :- १
भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह:-
- भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील.
- महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्त्वज्ञान.
- आधुनिक भारताच्या इतिहासातील अठराव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या.
- स्वातंत्र्यलढा – स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान.
- स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना.
- जगाच्या इतिहासामध्ये १८ व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद,
- निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी. त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील.
- भारतीय समाजाची ठळक वैशिष्टे आणि भारताची विविधता.
- महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्रय व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांचेशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना.
- जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम.
- सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता.
- जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्टे.
- जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण, (दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांसह)
- जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक (भारतासह ).
- भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रिय वादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्टे आणि त्यांचे स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्टे (जलाशये आणि हिमनग यांसह) तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम.
पेपर- ५ (२५० गुण)- सामान्य अध्ययन :- २
प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही भारांशासह:-
- भारतीय संविधान- ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्टे, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना.
- संघ व राज्ये यांची कार्ये व जबाबदाऱ्या संघराज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने.
- विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था.
- भारतीय सांविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना.
- संसद व राज्य विधानमंडळे – संरचना, कार्यप्रणाली, कामकाज चालविणे, अधिकार व विशेषाधिकार आणि यांपासून उद्भवणारे प्रश्न.
- कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन आणि कार्ये, सरकारची मंत्रालये व विभाग, दबाव गट आणि औपचारिक/अनौपचारिक संघ आणि त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका.
- स्थानिक स्वराज्य संस्था.
- लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्टे.
- विविध सांविधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध सांविधानिक मंडळाचे अधिकार कार्य व जबाबदाऱ्या
- वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे.
- विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या.
- विकास प्रक्रिया व विकास उद्योग अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट, विविध गट व संघ, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्थात्मक व इतर हित संबंधित व्यक्ती यांच्या भूमिका.
- समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था व मंडळे.
- आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र / सेवाशी निगडीत घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न.
- दारिद्रय व उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न.
- प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व, ई-प्रशासन:- उपयोजने, प्रतिमाने, यश, मर्यादा, व क्षमता यांबाबतचे महत्त्वाचे पैलू . नागरिकांची सनद, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना.
- नागरी सेवांची लोकशाही मधील भूमिका.
- भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध.
- द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि / किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामे
- विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम.
- महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच, त्यांची रचना व जनादेश.
पेपर ६ (२५० गुण) –सामान्य अध्ययन :- ३
तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांशासह:-
- भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनशी संबंधीत मुझे, साधनसंपतीचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार.
- सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या.
- सरकारी अर्थसंकल्प.
- देशाच्या विविध भागातील मुख्य पिके व पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती, साठवण, शेती उत्पादनांची वाहतूक व विपणन, मर्यादा व संबंधित अडचणी, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई-तंत्रज्ञान.
- प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतीशी संबंधित मुद्ये, सार्वजनिक वितरण प्रणाली – उद्दिष्टये, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा; शिलकी साठा व अन्नसुरक्षाची समस्या, तंत्रज्ञान मोहीम, पशुपालनाचे अर्थशास्त्र.
- भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग- व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन.
- भारतातील जमीन सुधारणा.
- अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम.
- पायाभूत सुविधा ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इत्यादी.
- गुंतवणूक प्रतिमाने.
- विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी व त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम.
- विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी; तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.
- माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमधील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित समस्या.
- संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण.
- आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम लवचिकपणा, लवचिक समाज.
- विकास आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यामधील दुवे.
- अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैरराज्य घटकांची भूमिका.
- संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये प्रसार माध्यमे व सामाजिक नेटवर्किंग | साईटसूची भूमिका, सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, आर्थिक गैरव्यवहार व त्यावरील प्रतिबंध.
- सुरक्षा आव्हाने आणि सीमाक्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध.
- विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे व त्यांचे जनादेश.
पेपर ७ (२५० गुण) –सामान्य अध्ययन :- ४ नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता.
या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास (केस स्टडी) याचा वापर केला जाईल. पुढील स्थूल क्षेत्रांचा समावेश केला जाईल.
अभ्यासक्रम:
- नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखताः मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिमाण, नीतिशास्त्र – खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमधील, मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यांपासून धडे, मूल्ये रुजविण्यासाठी कुटुंब, समाज व शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका.
- अभिवृत्ती: घटक, संरचना, कार्य; त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पाठपुरावा.
- नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, सचोटी, निःपक्षपातीपणा आणि पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती.
- भावनिक बुध्दांक संकल्पना आणि त्याची उपयोगीता, प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि उपयोजन. भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान.
- लोक प्रशासनातील सार्वजनिक/ नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकताः स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कोंडी; नैतिक मार्गदर्शनाचे स्त्रोत म्हणून कायदे नियम, विनियम व सदसद विवेकबुद्धी, उत्तरदायित्व आणि नैतिक शासन शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण: आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या; निगम प्रशासन.
- प्रशासनातील सभ्यता: लोकसेवेची संकल्पना: प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, माहितीची देवाण-घेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नीतिसंहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवाप्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने. वरील समस्यांवरील घटना अभ्यास.
पेपर- ८ (२५० गुण) व पेपर- ९ (२५० गुण): वैकल्पिक विषय पेपर एक व दोन
उमेदवारास, वैकल्पिक विषयांच्या यादीमधील कोणताही वैकल्पिक विषय निवडता येईल.
वैकल्पिक विषयांची यादी
- कृषी
- पशुसंवर्धन व पशुविज्ञान
- मानवशास्त्र
- जीवशास्त्र
- रसायनशास्त्र
- स्थापत्य अभियांत्रिकी
- वाणिज्य व लेखाशास्त्र
- अर्थशास्त्र
- विद्युत अभियांत्रिकी
- भूगोल
- भूशास्त्र
- इतिहास
- विधि
- व्यवस्थापन
- मराठी साहित्य
- गणित
- यांत्रिकी अभियांत्रिकी
- वैद्यक शास्त्र
- तत्त्वज्ञान
- भौतिकशास्त्र
- राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध
- मानसशास्त्र
- लोकप्रशासन
- समाजशास्त्र
- सांख्यिकी
- प्राणी शास्त्र
वरील वैकल्पिक विषयांचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेला आहे.
येणाऱ्या पुढील लेखांमध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या स्ट्रॅटेजीच्या उर्वरित घटकांबाबत चर्चा करू.